Warning: array_keys() expects parameter 1 to be array, string given in /home/u941628674/domains/designerpkyt.in/public_html/wp-content/plugins/tenweb-speed-optimizer/includes/OptimizerUtils.php on line 1422
फ्री सिलाई मशीन योजना 2024 | Free Silai Machine Yojana ऑनलाइन रजिस्ट्रेशन फॉर्म - Pandit Katvate

फ्री सिलाई मशीन योजना 2024 | Free Silai Machine Yojana ऑनलाइन रजिस्ट्रेशन फॉर्म

महाराष्ट्र सरकारद्वारे राज्यातील गरजू आणि गरीब लोकांच्या फायद्यासाठी नवीन नवीन योजना राबविण्यात येतात. त्यापैकी फ्री शिलाई मशीन योजना महाराष्ट्र 2023 ही एक महत्त्वाची योजना आहे . या मोफत शिलाई मशीन योजनेच्या माध्यमातून पूर्ण देशात आतापर्यंत 50000 हून अधिक महिलांना या योजनेचा म्हणजेच मोफत शिलाई मशीन योजनेचा फायदा झालेला आहे. तुम्ही देखील या फ्री सिलाई मशीन योजनेचा फायदा घेऊ शकता. परंतु या योजनेमध्ये सहभागी होण्यापूर्वी तुम्हाला या योजनेची पूर्ण माहिती घ्यायला हवी हीच माहिती आपण आजच्या आर्टिकल  मध्ये पाहणार आहोत. थोडक्यात जर या फ्रिज शिलाई मशीन योजनेच्या पात्रता विषयी सांगायचे म्हटले तर ज्या महिलांचे वय 20 ते 40 या दरम्यान आहे आणि त्याचबरोबर त्यांच्या पतीचे उत्पन्न बारा हजार रुपये एवढे किंवा यापेक्षा कमी असायला हवे तरच तुम्हाला आर्थिक रित्या कमजोर असे मानण्यात येऊन तुम्हाला फ्री शिलाई मशीन योजना 2024 यामध्ये अर्ज करता येईल. त्याचबरोबर तुम्ही जर शहरी भागात राहत असाल किंवा ग्रामीण भागात राहत असाल या दोन्ही भागातील महिलांना या योजनेसाठी पात्र ठरतील.

फ्री सिलाई मशीन योजना 2024

फ्री शिलाई मशीन योजना 2024 चे उद्दिष्ट

लोक डाऊन च्या काळात आपल्या देशातील खूप मोठे उद्योग धंदे बंद पडले होते त्यामुळे अनेक नागरिकांच्या नोकऱ्या गेल्या होत्या. आणि त्यामुळे देशातील युवक बेरोजगार झाले होते या सर्व गोष्टींचा विचार करून आपल्या केंद्र सरकारने फ्री शिलाई मशीन योजना ची सुरुवात केली.

आपल्या राज्यातील आर्थिक दृष्ट्या कमजोर असलेल्या आणि गरीब कुटुंबातील महिलांना घरी बसून कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याएवढे पैसे मिळावेत हे उद्दिष्ट समोर ठेवून  केंद्र सरकारने फ्री शिलाई मशीन योजनेची सुरुवात केली. या योजनेच्या म्हणजेच मोफत शिलाई मशीन योजनेची सुरू केल्यानंतर देशातील बहुतांश महिलांना रोजगार उपलब्ध होईल. त्याचबरोबर देशातील महिला स्वावलंबी व सक्षम बनतील असे या फ्री सिलाई मशीन योजनेचे उद्दिष्ट आहे.

फ्री शिलाई मशीन योजनेत समाविष्ट असलेल्या राज्यांची यादी

ही फ्री शिलाई मशीन योजना सध्या सरकारने राज्यस्तरावर चालू केली आहे त्यामुळे देशातील बऱ्याच राज्यांमध्ये ही फी शिलाई मशीन योजना अद्याप लागू झालेली नाही परंतु सरकार लवकरच या राज्यात सुद्धा फ्री शिलाई मशीन योजना लागू करणार आहे आणि ज्या राज्यांमध्ये ही योजना लागू झालेली आहे त्यांची यादी खालील प्रमाणे आहे.

 • महाराष्ट्र
 • गुजरात
 • हरियाणा
 • कर्नाटका
 • उत्तर प्रदेश
 • मध्य प्रदेश
 • राजस्थान
 • छत्तीसगड
 • बिहार
 • तमिळनाडू इ.

फ्री शिलाई मशीन योजना महाराष्ट्र

 • मोफत शिलाई मशीन योजनेचा माध्यमातून राज्यातील गरीब कुटुंबांना खूप मोठी मदत मिळणार आहे.
 • फ्री  शिलाई मशीन योजनेद्वारे देशातील आर्थिक दृष्ट्या कमजोर असलेल्या कुटुंबांना आणि कुटुंबातील महिलांना आपल्या सरकारकडून मोफत शिलाई मशीन देण्यात आली आहे.
 • या योजनेद्वारे महिलांना शिलाई मशीन मिळाल्यानंतर त्या घर बसून कुटुंबाचा उदरनिर्वाह करू शकतात.
 • मोफत शिलाई मशीन योजना 2020 च्या माध्यमातून केंद्र सरकारने आपल्या देशातील आतापर्यंत 50 हजार हून अधिक महिलांना शिलाई मशीन देण्यात आली आहे.
 • मोफत शिलाई मशीन योजनेचा मुख्य हेतू म्हणजेच महिलांना सक्षम आणि स्वावलंबी बनवणे हा आहे.
 • मोफत शिलाई मशीन योजनेद्वारे राज्यातील महिलांना रोजगार मिळवून देण्यात येईल.

फ्री शिलाई मशीन योजना महाराष्ट्र 2024 चे वैशिष्ट्ये

 • मोफत शिलाई मशीन केंद्र सरकारने चालू केली आहे .
 • आपल्या राज्यातील गरीब महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने मोफत शिलाई मशीन योजनेची सुरुवात केली आहे.
 • या फ्री सिलाई मशीन योजनेचा लाभ ग्रामीण आणि शहरी भागातील कुठल्याही महिलांना होईल.
 • फ्री शिलाई मशीन योजनेच्या माध्यमातून सरकार द्वारे तुम्हाला एक शिलाई मशीन देण्यात येईल.

फ्री शिलाई मशीन योजना महाराष्ट्र 2024 च्या संबंधित नियम व अटी

मोफत शिलाई मशीन योजना 2024 च्या संबंधित सर्व नियम व अटी पुढील प्रमाणे आहेत.

 • मोफत शिलाई मशीन योजनेचा लाभ पूर्ण भारतातील काही ठराविक राज्यातील महिलांना देण्यात येणार आहे.
 • मोफत शिलाई मशीन योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमचे वय 20 ते 40 वर्षाच्या आसपास असावे.
 • जर तुमचे वय 40 वर्षापेक्षा जास्त असेल तर तुम्ही फ्री शिलाई मशीन योजनेसाठी अपात्र ठराल.
 • जर तुमचे फॅमिली इन्कम एक पॉईंट दोन लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला या फ्रिज शिलाई मशीन योजनेचा लाभ घेता येणार नाही.
 • जर तुम्ही आर्थिक दृष्ट्या दुर्बल नसाल तर तुम्ही या योजनेचा फायदा घेऊ शकत नाही.
 • जर तुम्ही या अगोदर कुठल्याही राज्य सरकारच्या किंवा केंद्र सरकारच्या शिलाई मशीन योजनेचा लाभ घेतला असेल तर तुम्ही या मोफत शिलाई मशीन योजनेसाठी अपात्र आहात.
 • जर तुमच्या घरातील कुठलाही व्यक्ती सरकारी नोकरी करत असेल तर तुम्ही या मोफत शिलाई मशीन योजनेसाठी अपात्र ठराल.
 • मोफत शिलाई मशीन योजनेचा पुरुषांना दिला जाऊ शकत नाही.

फ्री शिलाई मशीन योजना 2024 साठी लागणारी कागदपत्रे

 • लाभार्थी महिलाचा वार्षिक उत्पन्नाचा प्रमाणपत्र
 • लाभार्थी महिलेचे आधार कार्ड
 • लाभार्थी महिलेचा पासपोर्ट साईज फोटो
 • लाभार्थी महिलेचे जन्म प्रमाणपत्र
 • मोबाईल नंबर
 • लाभार्थी महिलेचे महाराष्ट्र राज्यातील किंवा ज्या राज्यात ती रहिवासी असेल तर राज्यातील रहिवासी प्रमाणपत्र.
 • अर्जदार महिला अपंग असेल तर त्याचे अपंगत्व प्रमाणपत्र गरजेचे आहे.
 • शिधापत्रिका
 • लाभार्थी महिलेच्या जातीचा प्रमाणपत्र
 • लाभार्थी महिलेचे शिवणकाम यंत्र चालवता येण्याचे प्रमाणपत्र.

फ्री शिलाई मशीन योजनेसाठी ची पात्रता

 • मोफत शिलाई मशीन योजनेसाठी चार्ज करणाऱ्या लाभार्थी अर्जदाराचे वय 20 ते 40 च्या दरम्यान असायला हवे.
 • मोफत शिलाई मशीन योजनेसाठी पात्र होण्यासाठी लाभार्थी महिलेच्या पतीचे वार्षिक उत्पन्न एक पूर्णांक दोन लाख पेक्षा जास्त नसावे.
 • फ्री शिलाई मशीन योजना 2024साठी राज्यातील फक्त आर्थिक दृष्ट्या कमजोर असलेल्या कुटुंबातील महिला पात्र ठरतील.
 • देशातील अपंग महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

फ्री शिलाई मशीन योजना 2024 साठी ची अर्ज करण्याची प्रक्रिया

डाउनलोड करा

https://drive.google.com/uc?export=download&id=1ybZIgghct9WS2s_-VAnj9rRwMli3brF4
 • मोफत शिलाई मशीन योजनेचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला तुमच्या एरियातील नगरपालिका किंवा जिल्हा कार्यालयातील महिला व बालकल्याण विकास विभाग यांच्याकडे जाऊन या योजनेसाठी अर्ज करता येईल.
 • किंवा तुम्ही मोफत शिलाई मशीन योजनेला अर्ज भरण्यासाठी तो अर्ज ऑनलाईन डाउनलोड करून त्यावर विचारले गेलेले संपूर्ण माहिती योग्यरीत्या भरून तिथे सांगितलेली सर्व कागदपत्रे सोबत जोडून अर्ज सबमिट करा ता येईल .
 • तुम्ही लिहिलेली सर्व माहिती व जोडलेले कागदपत्रे संबंधित अधिकारी तपासून घेतील व त्यानंतर तुम्हाला मोफत शिलाई मशीन देण्यात येईल.

Leave a Comment