जीवधन किल्ला ||Jivdhan Fort Trekking through Naneghat

 

छत्रपती शिवाजी महाराज की जय

मित्रांनो आपला सह्याद्री म्हणजेच आपला एक रक्षक आहे ज्याप्रमाणे हिमालय आपल्या देशाचे रक्षण करतो, त्याचप्रमाणे आपला सह्याद्री आपल्या महाराष्ट्राचे  रक्षक करतो.
तर मित्रांनो अशा  सह्याद्री पर्वत रांगेतील पुणे मध्ये एक जुन्नर  पासून 30 किलोमीटर वरती जीवधन किल्ला आहे त्यांची इंफॉर्मेशन नाही तुम्हाला खाली दिलेली आहे.

जीवधन हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.

yAArOfq0Kt58LVAFpgy58wkbeyaGF3eFBwnKp3BIPkkQ3nJnl30hwEGvZbvHk VDxOTp6uHMKxOUZWVQPyIeSmDFv5MEQVWCAdSsuPO2bm7gXLY6 zmcK1iOKUNppY7iq096i483

नाव

जीवधन

उंची

३७५४मी.

प्रकार

गिरिदुर्ग

चढाईची श्रेणी

मध्यम

ठिकाण.                             

पुणे जिल्हा, महाराष्ट्र, भारत

जवळचे गाव

घाटघर

डोंगररांग

नाणेघाट

सध्याची अवस्था

बरी

स्थापना

अज्ञात

घाटघर च्या परिसरात असलेला हा पूर्वमुखी किल्ला प्राचीन नाणेघाटाच्या व्यापारी मार्गाच्या संरक्षणासाठी उभारण्यात आला होता. नाणेघाटापासून जीवधन किल्ला अगदी हाकेच्या अंतरावर आहे. जीवधनच्या पायथ्याचे गांव म्हणजे घाटघर. बांबूची बने हे या गावचे वैशिष्टय !

•इतिहास

शिवजन्माच्या वेळी अस्ताला जाणाऱ्या निजामशाहीच्या देणारा किल्ला म्हणजे जीवधन होय.[ अपूर्ण वाक्य] १७ जून १६६३ रोजी निजामशाही बुडाली.[ संदर्भ हवा ] शहाजीराजांनी निजामशाहीचा शेवटचा वंशज मुर्तिजा निजाम याला जीवधनच्या कैदेतून सोडवून संगमनेरजवळील पेमगिरी किल्ल्यावर त्याला निजामशहा म्हणून घोषित केले व स्वतः वजीर बनले.

गडाचा दरवाजा हा कातळकड्यामध्ये कोरलेला आहे.

•गदावरिल ठिकाणे 

पश्चिम दरवाजाने गडावर पोहोचल्यानंतर समोरच गजलक्ष्मीचे शिल्प आहे. स्थानिक लोक याला “कोठी” म्हणतात. दक्षिण दिशेस जीवाई देवीचे पडझड झालेले मंदिर आहे. आसपास पाण्याची टाकी आहेत. गडाच्या अंतर्भागात एकात-एक अशी पाच धान्य कोठारे आहेत. कोठारामधील कमलपुष्पांचे कोरीव नक्षीकाम आहे. १८१८ च्या शेवटच्या मराठे-इंग्रज युद्धात या कोठारांना आग लागली होती, त्यांची राख आजही या कोठारांमध्ये पहायला मिळते.

आयताकार असणार्‍या या गडाच्या टोकाला सुमारे ३५० फूट उंचीचा “वानरलिंगी” ऊर्फ खडा पारशी नावाचा एक सुळका लक्षवेधी आहे. समोरच नानाचा अंगठा, हरिश्चंद्रगड, हडसर, चावंड आणि कुकडेश्वराचे प्राचीन मंदिर आहे.

•गडावर जाण्यासाठी वाटा 

१. कल्याण-अहमदनगर मार्गे नाणेघाट चढून गेल्यानंतर एक पठार लागते. या पठाराच्या उजव्या बाजूला जाणारी वाट व वानरलिंगी नजरेसमोर ठेऊन चालत रहावे. वाटेत दोन ओढे लागतात व त्यानंतर उभी कातळभिंत. या भिंतीला चिटकून उजव्या हाताला असणारी वाट गडाच्या पश्चिम दरवाजाकडे जाते. इ.स. १८१८च्या युद्धात इंग्रजांनी ही वाट चिणून काढली व पश्चिम दरवाजाची वाट बंद केली. वानरलिंगीची ही वाट नावाप्रमाणे वानरयुक्त्या करुनच पार करावी लागते. ही वाट अवघड आहे, त्यामुळे जरा जपूनच चढावे.

२. जुन्नर – घाटघर मार्गे असणारी ही वाट म्हणजे राजमार्ग आहे. सोपी व सोयिस्कर वाट असली तरी, एक-दोन ठिकाणी उभ्या खोदलेल्या पायऱ्या पार कराव्या लागतात, त्यामुळे सोबत एखादा दोर जरुर ठेवावा.

राहण्याची सोयः नाही.

जेवणाची – पाण्याची सोयः जेवणाची स्वतःच करावी, पाण्याची बारमाही टाकी आहेत.

गडावर चढण्यासाठी लागणारा वेळः जुन्नर – घाटघर मार्गे – अंदाजे २ तास.

धन्यवाद…

Leave a Comment