२०२४ मध्ये मराठा विध्यार्थ्याला उच्च्यांशिक्षण घेण्यासाठी मिळणाऱ्या शिष्यवृत्ती |राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता योजना संपूर्ण माहिती

महाराष्ट्रातील गुणवंत आणि प्रतिभावान विद्यार्थ्यांचे उच्च शिक्षण पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र सरकार अनेक योजना राबवत असते. पुणे मुंबई सारख्या महानगरपालिकांमध्ये शिक्षण घ्यावे अशी बऱ्याच महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची स्वप्न असतात. पण पैशांच्या कमतरतेमुळे त्यांना महानगरपालिकांमध्ये प्रवेश घेणे अवघड जाते. अशा प्रतिभान आणि गुणवंत विद्यार्थी त्यांना आपले उच्च शिक्षण महानगरपालिकांमध्ये पूर्ण करायचे आहे किंवा ज्यांना व्यवसायिक शिक्षण घेऊन आपले भविष्य उज्ज्वल करायचे आहे. अशा विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र सरकार राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता योजना अशा दोन शिष्यवृत्ती ओपन कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांना देते त्यामुळे त्यांना व्यावसायिक शिक्षण घेण्यासाठी मदत मिळते. तर आज या ठिकाण मध्ये आपण दोन्ही योजना बद्दल माहिती घेणार आहोत ज्यामध्ये अर्ज कसा करायचा ,पात्रता ,निकष, नियम व अटी सर्व काही जाणून घेणार आहोत त्यामुळे संपूर्ण आर्टिकल नक्की वाचा. 

स्कॉलरशिप

राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती 2023

वैद्यकीय (pharmacy) शिक्षण घेण्यासाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांना राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती बद्दल माहिती असणे आवश्यक आहे. राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती मध्ये व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक शुल्कामध्ये 50% सूट दिली जाते. हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की ही शिष्यवृत्ती फक्त मराठा किंवा महाराष्ट्र राज्यातील ओपन कॅटेगरी मधील विद्यार्थ्यांनाच लाभदायक आहे. या योजनेमध्ये 50% ट्युशन फी तसेच 50% परीक्षा शुल्क कमी होते.

राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती महत्त्वाचे पॉईंट्स

  • राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती ही फक्त ओपन कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांसाठीच आहे.
  • राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती मध्ये 50% ट्युशन फी वरती विद्यार्थ्यांना सवलत दिली जाते.
  • त्याचबरोबर या शिष्यवृत्ती मध्ये विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क मध्येही 50% सवलत दिली जाते.
  • राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती ही महाराष्ट्रातील जवळपास सर्व अनुदानित व विनाअनुदानित शिक्षण संस्थेमध्ये दिली जाते.
  • विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेण्यापूर्वीच राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती बद्दल शिक्षण संस्थेला विचारपूस करणे आवश्यक आहे.
  • वैद्यकीय,अभियांत्रिकी व इतर 605 हून अधिक अभ्यासक्रमाच्या समावेश होता. 
  • व्यावसायिक शिक्षण न घेणार्‍या विद्यार्थ्यांना 100% परीक्षा शुल्क दिले जाते. 

 डॉ. पंजाबराव देशमुख वसतीगृह निर्वाह भत्ता शिष्यवृत्ती 

राज्य सरकार राज्यातील शेतकरी, शेतमजूर आणि कामगार त्याचबरोबर ग्रामीण भागातील व शहरी भागातील गरीब नागरिकांसाठी अनेक योजना राबवत असते. कामगार आणि शेतकरी कुटुंबातील गरीब विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शहरांमध्ये जाऊन त्या ठिकाणी वस्तीगृहात राहावे लागते, किंवा काही विद्यार्थी रूम भाड्याने घेऊन राहतात. शहरांच्या ठिकाणी वस्तीगृह आणि रूम यांचे भाडे खूप जास्त असते. पुणे सारख्या ठिकाणी वस्तीगृह मध्ये राहण्यासाठी विद्यार्थ्याला किमान 60 ते 65 हजार रुपये लागतात. यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी आणि गरीब विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र सरकारने डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह ही योजना आणलेली आहे. या योजनेमध्ये शेतकरी आणि कामगार कुटुंबातील मराठा विद्यार्थ्यांना वस्तीगृहात राहण्यासाठी सरकारकडून आर्थिक मदत केली जाते.

वैद्यकीय (pharmacy) शिक्षण घेण्यासाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांना डॉ. पंजाबराव देशमुख वसतीगृह निर्वाह भत्ता शिष्यवृत्ती  बद्दल माहिती असणे आवश्यक आहे. हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की ही शिष्यवृत्ती फक्त मराठा किंवा महाराष्ट्र राज्यातील ओपन कॅटेगरी मधील विद्यार्थ्यांनाच लाभदायक आहे. या योजनेमध्ये कमाल 30000 रुपये पर्यंत विद्यार्थ्यांना वस्तीगृहात राहण्यासाठी मदत केली जाते.

डॉ. पंजाबराव देशमुख वसतीगृह निर्वाह भत्ता शिष्यवृत्ती  महत्त्वाचे पॉईंट्स

  • डॉ. पंजाबराव देशमुख वसतीगृह निर्वाह भत्ता शिष्यवृत्ती  ही फक्त ओपन कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांसाठीच आहे.
  • डॉ. पंजाबराव देशमुख वसतीगृह निर्वाह भत्ता शिष्यवृत्ती  मध्ये कमाल 30,000 रुपयांची आर्थिक मदत दरवर्षी मिळते.
  • विद्यार्थी जर उच्च शिक्षणासाठी महानगरात जसे की मुंबई ,पुणे ,औरंगाबाद ,नागपूर या ठिकाणी प्रवेश घेतलेला असेल आणि विद्यार्थी अल्पभूधारक किंवा रजिस्टर मजूर असेल तर विद्यार्थ्यांना तीस हजार रुपये मिळतात.
  • आणि जर विद्यार्थ्याकडे अल्पभूधारक नसेल तर त्या विद्यार्थ्याला फक्त दहा हजार रुपये मिळतात.
  • मुंबई, महानगर, पुणे, औरंगाबाद ,नागपूर शहरांव्यतिरिक्त दुसऱ्या शहरांमध्ये विद्यार्थ्याला फक्त 20 हजार रुपये मिळतात.
  • विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेण्यापूर्वीच डॉ. पंजाबराव देशमुख वसतीगृह निर्वाह भत्ता शिष्यवृत्ती  बद्दल शिक्षण संस्थेला विचारपूस करणे आवश्यक आहे.
  • वैद्यकीय,अभियांत्रिकी व इतर 605 हून अधिक अभ्यासक्रमाच्या समावेश होता. 

पुणे मुंबई सारख्या महानगरपालिकांमध्ये शिक्षण घ्यावे अशी बऱ्याच महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची स्वप्न असतात. पण पैशांच्या कमतरतेमुळे त्यांना महानगरपालिकांमध्ये प्रवेश घेणे अवघड जाते. अशा प्रतिभान आणि गुणवंत विद्यार्थी त्यांना आपले उच्च शिक्षण महानगरपालिकांमध्ये पूर्ण करायचे आहे किंवा ज्यांना व्यवसायिक शिक्षण घेऊन आपले भविष्य उज्ज्वल करायचे आहे. अशा विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र सरकार राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता योजना अशा दोन शिष्यवृत्ती ओपन कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांना देते त्यामुळे त्यांना व्यावसायिक शिक्षण घेण्यासाठी मदत मिळते.

Leave a Comment