गुढी पाडव्याचा शुभ मुहूर्त; जाणून घ्या यंदाची तिथी, पूजेची वेळ – Gudi Padwa 2024 Muhurat

हिंदूंचे नववर्ष सुरू होते चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवसापासून, ज्याला चैत्र शुक्ल प्रतिपदा असे म्हणतात. या दिवशी भारतामध्ये प्रत्येक राज्यांमध्ये वेगवेगळ्या परंपरेने नवीन वर्ष साजरे केले जातात. महाराष्ट्रामध्ये हा सण गुढीपाडवा नावाने साजरा केला जातो. यावर्षी गुढीपाडवा 9 एप्रिल 2024 या दिवशी आहे. या आर्टिकल मध्ये आपण गुढीपाडव्याचे महत्त्व आणि गुढीपाडव्याचे मुहूर्त या सर्वांची माहिती घेणार आहोत.

Gudi Padwa 2024 Muhurat

गुढीपाडव्याचे महत्त्व:

गुढीपाडव्याला हिंदू संस्कृतीमध्ये आणि विशेषतः महाराष्ट्र संस्कृतीमध्ये अत्यंत महत्त्व आहे. गुढीपाडवा नवीन सुरुवात समृद्धी आणि वाईट यावर चांगल्या चे विजयाचे प्रतीक आहे. गुढीपाडव्याला ऐतिहासिक तसेच पौराणिक कथेमध्ये महत्त्वाचे स्थान आहे. स्वतंत्र भारताने आपले राष्ट्रीय कॅलेंडर म्हणून शक कॅलेंडर ला मान्यता दिली आहे. शेका कॅलेंडर अनुसार सुद्धा चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजेच नवीन वर्षाचा पहिला दिवस होय. त्यामुळे सर्व हिंदू यांनी सर्व भारतीयांनी चैत्रशुद्ध प्रतिपदेलाच आपले नवीन वर्ष साजरी केले पाहिजे.

 हिंदू कथेनुसार सृष्टी निर्माता ब्रह्मदेव यांनी याच दिवशी सृष्टीची निर्मिती केली होती, त्याचबरोबर काही धर्मग्रंथांमध्ये सत युगाची सुरुवात पण गुढीपाडव्या दिवशीच म्हणजे चैत्र शुक्ल प्रतिपदेलाच झाली असे म्हणतात.

 महाभारतामध्ये देखील याच दिवशी  महाराज  युधिष्ठिर  यांचा राज्याभिषेक देखील या दिवशी झाला होता.

उत्सव आणि प्रथा:

महाराष्ट्र मध्ये गुढीपाडवा मोठ्या जल्लोषाने आणि उत्साहाने साजरा केला जातो. यामध्ये प्रमुख विधी म्हणजे गुढी उभारणे. महाराष्ट्रातील प्रत्येक घरांच्या समोर शुभेच्छांनी सजवलेला पारंपारिक ध्वज म्हणजेच गुढी उभारली जाते. गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे.  गुढीपाडव्याची तयारी करताना घराचे कचकसून साफसफाई आणि सजावट करणे हे महत्त्वाचे आहे. या दिवशी महाराष्ट्रातील प्रत्येक घरामध्ये पुरणपोळी श्रीखंड आणि पुरी भाजी यांसारखे खाद्यपदार्थ जेवणाच्या टेबलवर शिवा वाढवतात. सकाळी लवकर उठून गुढीसाठी बांबू आणि तिला साडी  परिधान करणे, किंवा ध्वज असेल तर ध्वज लावणे त्याला गाठ्या लावणे त्याची पूजा करून त्याला घरासमोर उभा करणे, या सर्व गोष्टी परंपरेमध्ये येतात.

Gudi Padwa 2024 Muhurat

गुढी पाडवा 2024 साठी शुभ वेळ: 

गुढीपाडवा म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात. आणि यावर्षी गुढीपाडवा येत आहे 9 एप्रिल 2024 रोजी. या दिवशी सकाळी लवकर अभंग स्नान करून, विष्णु भगवान आणि लक्ष्मी मातेची पूजा त्याचबरोबर ब्रह्मदेव व दुर्गा मातेची ही पूजा करावी. यानंतर गुढी उभारावी. कुटुंबीयांनी अभ्यंग स्नान लवकर करून गुढीचा प्रसाद आणि दर्शन घ्यावे. आणि ईश्वराकडे आपल्या कुटुंबीयांची आणि जगाच्या कल्याणाची इच्छा मागावी.

Gudi Padwa 2024 Muhurat

पंचांगानुसार गुढीपाडवा 2024 च्या मुहूर्ताच्या वेळा खालीलप्रमाणे आहेत:

गुढी पाडव्याची प्रतिपदा तिथी 08 एप्रिल 2024 रोजी रात्री 11:50 वाजता सुरू होईल आणि प्रतिपदा तिथी 09 एप्रिल 2024 रोजी रात्री 08:30 वाजता समाप्त होईल. उदयतिथीनुसार गुढीपाडव्याचा सण ९ एप्रिललाच साजरा केला जाणार आहे.

गुढीपाडवा, त्याचे समृद्ध सांस्कृतिक महत्त्व आणि जुन्या परंपरांसह, जगभरातील कोट्यवधी हिंदूंसाठी आनंद आणि समृद्धीचे आश्रयस्थान आहे. हिंदू नववर्षाची सुरुवात श्रद्धेने आणि आनंदाने करत असताना, या शुभ सोहळ्यात अंतर्भूत असलेल्या लवचिकतेच्या आणि नूतनीकरणाच्या शिकवणीचा स्वीकार करूया. भगवान ब्रह्मदेवाचे आशीर्वाद आणि गुढीपाडव्याच्या दैवी शक्तींनी आपले जीवन पुढील वर्षात भरभरून आणि आनंदाने उजळून टाकावे.

Leave a Comment