Must Read Before Celebrating 31 And New Year 2022

 

आज ३१ डिसेंबर आहे. बहुतेक जण न्यूईअर पार्टीच्या लगबगीत आहेत.

पोलिसांच्या निर्बंधांतून मार्ग नाही काढता आला, तर तो पार्टीबहाद्दर कसला? या रात्री आपल्या देशात करोडो लिटर दारू फस्त केली जाते.

दारू घेतली तर स्वातंत्र्य एन्जॉय करता येते, असे काहीतरी तत्त्वज्ञान नव्याने उदयास येत आहे. दारू पिणे हे (विशेषकरून स्त्रियांच्या स्वातंत्र्याचे • प्रतीक मानले जावे, याच्या इतके नैतिक आणि वैचारिक अधःपतन असू शकत नाही.कोरोना टाळेबंदी पहिल्यांदा उघडली ती दारूच्या दुकानांची.कारण राज्य चालवायला महसूल लागतो तो मुख्यत्वेकरून दारूविक्रीतूनच मिळतो. त्याचदरम्यान समाजमाध्यमातून अनेक गमतीदार पोस्ट फिरत होत्या. त्यातील एकीत म्हटले होते, ‘आमच्याशिवाय राज्य चालवणे शक्य नाही इति मद्यपी.

जनांदोलनातून २०१५ साली लागू केलेली चंद्रपूर जिल्ह्याची दारूबंदी महाराष्ट्र शासनाने नुकतीच उठवली.आता धान्यापासून दारूनिर्मिती धोरण राबविण्याचा निर्णय घेतला आहे. विदेशी दारूवरील ३००% कर आता निम्मा करण्यात आला आहे. किराणा दुकानात वाइन विक्रीला परवानगी देण्याचा विचारही सुरू आहे. म्हणजे महाराष्ट्राला महाराष्ट्र का म्हणू नये?’ असाच प्रश्न! –

सहज उपलब्धता 

३१ डिसेंबरच्यारात्री समजा एक लाख मुलांनी दारूची पहिली चव घेतली, तर त्यातील १५ते २० हजार मुले पुढील आयुष्यात दारुडे बनणार आहेत, असे संशोधन सांगते. दारूच्या व्यसनामुळे मेंदूवर ताबा न राहिल्याने अपघात, भांडण, अत्याचार, हिंसाचार, शेवटी पोलीस स्टेशन, अशी ही मालिका संबंध कुटुंबाला पर्यायाने समाजालाच मोठी समस्या ठरते.

यावरचा पहिला उपाय म्हणजे दारूच्या पहिल्या थेंबाची चव न घेणे. पालकांनी स्वतः दारूपासून दूर राहणे व मुलांना सजग करणे. ३१ डिसेंबरच्या रात्रीचा माहोल आणि मद्याच्या मोहात पडता कामा नये. नववर्षाच्या स्वागतमैफलीत गद्य-पद्य असावे; पण मद्य नको. नववर्षाचे स्वागत शुद्धीत करूया, धुंदीत कशाला?

– डॉ. अजित मगदूम, अन्वय डि ऍडिक्शन सेंटर,नवी मुंबई

Source : लोकमत 

http://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_PULK_20211231_6_5

Leave a Comment